आजचा सुविचार

आजचा सुविचार:- " आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. !"

वाचा व विचार करा


 १. दोशी माणुस म्हणुन एखाद्या कडे बोट दाखवताना हजार वेळा विचार करा, कारण ज्या वेळी तुम्ही दुसर्याकडे एक बोट दाखवता त्यावेळी तुमची स्वत:ची तीन बोटे तुमच्याकडे वळलेली असतात. त्यामुळे आपण तिप्पट दोषी असतो.

२. माता या दोन शब्दात हिमालयाची उत्तुन्गता, सागराची अथागता व आकाशाची विशालता असते.

३. प्रिती आणि पराक्रम हे जीवनाचे दोन डोळे आहेत.

४. पर्णभार हे वेलीचे वैभव आहे, पण फुल हे तिच्या सुखाचे आणि सौर्द्याचे सार आहे.

५. आयुष्याचे कोडे किती विलक्शण आहे, ते सोडवण्याची धड्पड केली तर त्यात अधीकच गुन्तागुन्त होऊ लागते.

६. आयुष्यात मोहाचे क्शण वारवार येतात, पण त्यावर जे विजय मिळवतात तेच आपल्या आयुष्यात सत्ता गाजवु शकतात.

७. लोकाच्या मारया पुढे मणुष्य एकवेळ टीकाव काढेल, पण प्रेमळ शब्दापुढे त्याला माघार घ्याविच लागते.

८. जग माणसाच्या मणातल्या दयेवर चालत नाही, ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालते.

९. पशुना द्रव्याची इछा नसते, पण हिच इछा मणुष्याला कधी कधी पशु बनवते.

१०. स्मित आणि अश्रु ही स्त्रि चि दोन प्रभावि अस्त्रे आहेत.

११. जिवन म्हणजे अनंत आव्हानं, प्रदिर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी आहे.



                                                                


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा