त्याच्या प्रत्येक वळनावर आपलं आयुष्य बदलत असतं
बदललेल्या प्रत्येक क्षणात सुख दुखःची शिदोरी घेवुन पुढे जायच असतं
जिवन असचं जगायचं असतं ..........॥१॥
जिवनात येणारया प्रत्येकाला आपण सुख दयायचं असतं
स्वतः दुःखि राहुन इतरानां सुखवायचं असतं
इतराच्या सुखात स्वतःच दुःख विसरायचं असतं
जिवन असचं जगायचं असतं ..........॥२॥
जात धर्म विसरुन सर्वांवर सारखंच प्रेम करायचं असतं
प्रेमाच्या वाटेवर स्वतःला विसरायचं असतं
प्रेम करणारयांनी प्रेमा शिवाय दुसंर काही मागायचं नसंत.
जिवन असचं जगायचं असतं ..........॥३॥
जे आपल्या पासुन दुर गेले त्यांच्या आठवणिंना जपायच असतं
एकांतात त्या आठवणिंना ऊजाळा देऊन, मन हलकं होई पर्यंत कोसळायचं असतं
जे आपले आहेत त्यांना आपलं दुःख कळु दयायचं नसंत
जिवन असचं जगायचं असतं ..........॥४॥
जिवनातिल प्रत्येक प्रसंगाला सामोरं जायचं असतं
त्या प्रसंगातुन इतरांनाही बरोबर घेउन जायचं असतं
एका ठीकाणी न थांबता सततं पुढे जायंच असतं
जिवन असचं जगायचं असतं ..........॥५॥
प्रेमाच्या प्रत्येक क्षणात सर्व काही विसरायंच असतं
ज्याला प्रेमाचा अर्थ समजला त्यानेच प्रेम करायचं असतं
जो आपल्यावर प्रेम करतो त्याला कधिच दु:खवायचं नसंत
जिवन असचं जगायचं असतं ..........॥५॥
आपला मित्र
लक्ष्मण कदम.